अलिबागच्या शेतकर्यांचे ईडीपुढे जबाब
| मुंबई | प्रतिनिधी |
खा.संजय राऊत यांच्या अडचणीत दिवंसेदिवस वाढ होत चालली असून, आता अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांनीही थेट ईडीपुढे जबाब नोंदवत राऊतांनी चुकीच्या पद्धतीने जमिनी संपादित केल्याचा आरोप केला आहे. असे वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने दिलेले आहे.
चार महिन्यांपूर्वी ईडीने अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथील स्थावर मालमत्तेवर धाड टाकली होती. या प्रकरणी आता संबंधित जमीनधारकांचेही जबाबही ईडीने नोंदवून घेतले आहेत. यामध्ये राऊतांनी चुकीच्या पद्धतीने धाक दाखवून जमिनी संपादित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.