। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ गावातील हेटकर आळी येथे राहणारे विनोद भगत यांचा 33 वर्षीय मुलगा अनिकेत याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मध्य रेल्वेमध्ये टीसी म्हणून सेवानिवृत्त झालेले विनोद भगत यांचा मुलगा अनिकेत हा ॲनिमेशन आणि फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करीत होता. अनिकेत याला राहत्या घरी हृदय विकाराचा तीव्र झटका आला असता कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
अनिकेत यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, भाऊ, वहिनी आणि काका, काकी असे मोठे कुटुंब आहे. एका उमद्या कलाकाराचा अल्प वयोमान असताना मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.