| सांगोला | प्रतिनिधी |
नाझरा ता. सांगोला येथील माणनदी पात्रात मासे धरावसाय गेलेल्या युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना (दि.9) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
स्वप्निल राजू रणदिवे (वय १८) असे नदीच्या पाण्यात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास स्वप्निल रणदिवे हा त्याच्या मित्रांसोबत मासे पकडण्याकरिता गावातील माण नदीवर गेला होता. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास सुरज रणदिवे यांना आदर्श ढोबळे याने फोन करुन सांगितले की, तुझा भाऊ स्वप्निल हा पाण्यात पडला आहे, तो वर आला नाही, तु लवकर ये. तेव्हा सुरज रणदिवे हे लगेच नदीवर गेले आणि नदीमध्ये पाण्यात शोधाशोध केली, परंतु स्वप्निल हा मिळून आला नाही.
यावेळी ग्रामस्थही सदर ठिकाणी जमा झाले होते. तहसिलदार सांगोला यांनी यावेळी स्वप्नील यांचा नदीपात्रात शोध घेण्यासाठी पथक पाठविले. त्या पथकास सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भाऊ स्वप्निल रणदिवे हा नदीमध्ये पाण्यात तळाशी मिळून आला. त्याला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे घेऊन आले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मयत झाला असल्याबाबत सांगितले.