जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा मेळावा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेमध्ये सेवा देऊन सेवानिवृत्त कर्मचार्यांचे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला एक उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आजही या संघटनने कायम ठेवली आहे. याचे उदाहरण आजचा जिल्हा मेळावा आहे, असे गौरवोद्गार संघटनेचे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष सखाराम पवार यांनी काढले आहेत.
रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटना रायगडचा जिल्हा मेळावा कुरूळ येथील क्षात्रैक्य समाज हॉल येथे बुधवारी (दि.8) आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष तथा रा.जि.प.चे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेले, लेखाधिकारी सतीश भोळवे, रा.जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष जी.एच. पाटील, उपाध्यक्ष अजित जाधव, डी.जी. मानकर, सचिव सुरेश म्हात्रे, खजिनदार किशोर घरत, सदानंद शिर्के, रा.जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, माजी अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, डॉ. राजू म्हात्रे, न.मो. घरत, आय.के. दळवी, ए.बी. पाटील, मदन मोरे, नामदेव शिंदे, प्रकाश म्हात्रे, डॉ. रवींद्र पाटील, सुचिता पाटील, सुनील पाटील, सदानंद शेळके, नाट्यचित्रपट अभिनेते शरद कोरडे, कोकणनामाचे संपादक उमाजी केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांनी सांगितले की, रायगडचे भाग्य विधाते प्रभाकर पाटील अध्यक्ष असताना निवृत्तीच्या वेळी पेन्शनची ऑर्डर हातात ठेवली जायची. ही प्रथा नंतर बंद पडली. आता संगणक युगात ही सोय झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी नाईक यांनी केली आहे.
सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सन्मान
रा.जि.प.च्या सेवानिवृत्त 80 वर्ष व त्यापुढील वयोगटातील कर्मचारी सखाराम पवार, द्वारकानाथ नाईक, दत्तात्रय मुकादम, सदानंद इकर, श्रीकांत पाटील, दोडाचार्य व्यंकटाचार्य, नारायण भगत, रमेश वाकडे, आत्माराम पाटील, कुसूम पाटील, शरद गडेकर, हरिश्चंद्र पाटील, वामन बने, रामचंद्र डाके, तुळशीराम मोरजकर,कृष्णकांत मोरजकर, साधा फाटक, गोविंद पवार, पांडुरंग राऊळ, शशीकांत पाटील, बाबुराव देशमुख, अशोक सावंत, तुकाराम म्हात्रे, नारायण म्हात्रे, प्रकाश लोखंडे, विश्वनाथ पाटील, रामचंद्र लाड, शिवाजी खानविलकर या सेवानिवृत्त कर्मचार्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
निमंत्रित अधिकार्यांची गैरहजेरी
या मेळाव्याला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, ग्रामपंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना प्रमुख पाहूणे निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमाला त्यांनी गैरहजेरी लावली. मान्यवर उपस्थित न राहिल्याने सेवानिवृत्त कर्मचारी वर्गात नाराजीचे सुर उमटले. अनेकांनी अधिकार्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.