झायडस कॅडीलाला भारतात मंजुरी;ऑक्टोबरपासून लसीकरणाची शक्यता

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
जगातील पहिली डीएनए व्हॅक्सिन झायडस कॅडीला या लसीला भारतात मंजुरी मिळाली असून 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी संबंधित लसीकरण ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनटी-जीआय प्रमुख एन.के.अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार करण्यात येणार असून याच मुलांचे लसीकरण सर्वात पहिला करण्यात येणार आहे. तसेच मुलांचा बौद्धिक विकास महत्त्वाचा असून प्राथमिक शाळा लवकरात लवकर सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी राज्य सरकारांना दिला. कदाचित लसीकरणाच्या प्रारंभी कंपनीकडून झायडस कॅडिला ही लस मर्यादित प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. या लसीचे तीन डोस देण्यात येणार आहेत. कॅडीला हेल्थकेअर लिमिटेडने 1 जुलै रोजी लसीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. या लसीची प्रत्यक्ष तपासणी अठ्ठावीस हजारांहून अधिक लोकांवर करण्यात आली. ही लस 66.6 टक्के इतकी प्रभावी ठरली असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version