। पंढरपूर । प्रतिनिधी ।
गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग आणि इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेल (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईटस अँन्ड पेटंट फायलिंग या विषयावर स्वेरीत एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली.
डॉ. पद्माकर केळकर म्हणाले की, एखादे पेटेंट फाईल करताना त्याचा आपण वेगवेगळ्या दृष्टीने विचार करायला हवा. तुमच्या आयडिया इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये कन्व्हर्ट करुन मेक इन इंडिया च्या माध्यमातून देशाची प्रगती कशी साधता येईल. डॉ. पासलकर म्हणाले की, स्वेरी ही शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने आघाडीवर असते. त्याचाच एक भाग म्हणून आयोजिलेल्या या कार्यशाळेतून सर्वांना पेटंट फायलिंग बद्दल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वांनी कमीत कमी एक तरी पेटंट फाईल करण्याचा प्रयत्न करावा. स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे यांनी भारत व चीन यांच्यामध्ये पेटंट फायलिंगमध्ये असणारी तफावत तसेच ही तफावत दूर करण्यासाठी कशी पावले उचलावी? यावर विचार व्यक्त केले. संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे यांनी स्वेरीच्या वाटचाली संबंधी माहिती सांगून स्वेरीतील उपक्रमांबद्दल माहिती दिली. डॉ. प्रशांत पवार यांनी कॉपीराइट वा ट्रेडमार्क म्हणजे काय ? हे सांगून कोणत्या गोष्टीचे पेटंट करता येते व कोणत्या गोष्टीचे करता येत नाही यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. आशिष जाधव यांनी पेटंट फाईल करताना लागणार्या पायाभूत गोष्टी तसेच पेटंट फाईल करतानाची कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली.