| उरण |वार्ताहर |
उरण तालुक्यातील, उरण तालुका बार असोसिएशच्या कार्यकारणीची सन 2024 ते 2026 करीता निवडणूक नुकतीच संपन्न झाली. उरण तालुका बार असोसिएशच्या अध्यक्षपदी जेष्ठ विधीज्ञ ॲड. विजय लहु पाटील यांचे बाजूने वकीलांनी कौल दिला.
तसेच उपाध्यक्षपदी ॲड. किशोर धनाजी ठाकुर, महीला उपाध्यक्षपदी ॲड. जागृती चेतन गायकवाड, सचिवपदी ॲड. योगेश जयंत गांगण, खजिनदारपदी ॲड. अर्चना माळी, ऑडीटरपदी ॲड. अपूर्वा ठाकुर, सह-सचिवपदी ॲड. प्रज्ञा सरवणकर, सदस्यपदी ॲड. रोहन म्हात्रे, ॲड. नितेश पाटील, ॲड. आरती भोईर आणि ॲड. अझमीन अन्सारी यांची निवड झाली आहे. वकील संघटनेची निवडणूक शुक्रवारी (दि.1) उरण येथील मा. न्यायालयच्या वकील कक्षात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. संपदा मोकल यांचे काम पाहीले. वकील संघटनेची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणांत पार पडली आहे. सर्व वकील मतदारांनी कार्यकरणी प्रती विश्वास दाखविला असून, कार्यकारणीने देखिल वकीलांच्या हितार्थ काम करण्याचा संकल्प केला आहे.







