| खोपोली | प्रतिनिधी |
समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत प्रासोल केमिकल लिमिटेडचे चेअरमन निषिद शहा यांचा वाढदिवस डॉ. कुंदा दोंदे-सुभाष दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट खोपोलीमधील गतिमंद व दिव्यांग मुलांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मुलांना स्टेशनरी साहित्य, मिठाई व भोजन देण्यात आले. तसेच त्यांच्या संगोपनासाठीही कंपनीच्या वतीने सहाय्य करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशशिक्षण -ट्रस्टमधील मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा करत प्रासोल केमिकल लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित केली. केवळ औपचारिकता न ठेवता मुलांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घेण्यात आले. विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनालाही स्पर्शून गेला. वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक जाणीव, माणुसकी आणि सहकार्याचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.







