चिंध्रण ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरपट्टीमध्ये 50 टक्के सवलत देणार असल्याचे ग्रामपंचायतीने जाहीर केले आहे. दरम्यान, चिंध्रण येथील जि.प. शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मिरवणूक काढून, फुलांचा वर्षाव करत आणि पावलांचे ठसे घेऊन या विद्यार्थ्यांचा ज्ञानमंदिरात प्रवेश सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. यावेळी चिंध्रणचे सरपंच एकनाथ पाटील, उपसरपंच मनोज कुंभारकर, सदस्य जीवन पाडेकर, ग्रामविकास अधिकारी ईश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जागृती पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जाधव, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचे सरपंच एकनाथ नामदेव पाटील यांनी जाहिर केले.







