| उरण | प्रतिनिधी |
रायगडमधील साहित्यिकांची आषाढीला “साहित्य वारी” निघते हा रायगडाचा अभिमान आहे, असे मत ॲड. गोपाळ शेळके यांनी व्यक्त केले. उरण तालुक्यातील नवघर येथून कोकण मराठी साहित्य परिषद साहित्यिकांची शनिवारी (दि.18) पंढरपुरला आषाढी वारी निघाली. त्यावेळी ते बोलत होते.
यंदा कोमसापची ही 16वी वारी आहे. ही वारी कोमसाप विश्वस्त साहित्यरत्न प्रा. एल.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघते. दरम्यान, मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी श्रीफळ वाढवून प्रस्थानास सुरुवात केली. यावेळी शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, बाल विभाग प्रमुख संजीव पाटील, जिल्हा सचिव संजय होळकर, रामसुनील म्हात्रे, नाटककार किशोर पाटील, कवी नरेश पाटील, महेंद्र गावंड, किशोर म्हात्रे, नाटककार भारत पाटील, संजय पाटील, जान्हवी गंधार, अर्चना विनय, सरिता सुनील आणि उज्ज्वला देविदास या अठ्ठावीस बंधुभगिनीनी विठुरायाच्या गजरात दिडींची सुरुवात केली. वारीच्या विश्रांतीच्या पाहिल्या टप्प्यात रसायनीतील नढाळ मंदिरात शांताराम देशमुख, गोपाळ शेळके, दत्ताराम शेळके, जयपाल पाटील आणि निखिल देशमुख आदींनी वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर रात्री 11.00 वाजता साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. यावेळी मच्छिंद्र म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, किशोर पाटील, नरेश पाटील, संजय होळकर, रमण पंडित, संजय पाटील, किशोर म्हात्रे आणि महेंद्र गावंड यांचे संजीव पाटील यांच्या सूत्रसंचालनात सुरेख कविसंमेलन संपन्न झाले.







