गितांजली शेट्टे 95.60 टक्के मिळवून प्रथम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्यातील दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.13) दुपारी ऑनलाईन जाहिर करण्यात आला. यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूल वेश्वीची विद्यार्थिनी गितांजली शेट्टे ही 95.60 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आली आहे.
पीएनपी संस्थेतील मराठी माध्यम माध्यमिक शाळा वेश्वी शाळेची विद्यार्थिनी अनन्या निर्मल 88.80 टक्के गुण मिळवून प्रथम, माध्यमिक शाळा रोहा-तळाघर शाळेची विद्यार्थी प्रीत धामणसे 86.40 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर माध्यमिक शाळा बीड-कर्जत विद्यार्थी गौरव लोभी 86.20 टक्के गुण मिळवून तृतीय आलेला आहे. तर, इंग्रजी माध्यमांमध्ये होली चाईल्ड स्कूल वेश्वीची विद्यार्थिनी आर्या बुरांगे 95.40 टक्के गुण मिळवून प्रथम, मान्यता म्हात्रे 94 टक्के गुण मिळवून द्वितीय व श्रुष्टि राऊत 93.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.तसेच, पीएनपी सीबीएसई स्कूलचा निकाल 92 टक्के लागला असून गितांजली शेट्टे ही 95.60 टक्के गुण मिळवून प्रथम, अल्फिया बिरादर 94.4 टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऋतुजा बांधणकर 88.20 टक्के गुण मिळवून तृतीय आलेली आहे.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले आहे.