कुंभारघर येथे 200 लसीकरण

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या विद्यमानाने व सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने सोमवारी (ता.27) कुंभारघर येथे मोफत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी तब्बल 200 जणांनी कोविड लस घेतली.

यावेळी गीता पालरेचा, तहसिलदार दिलीप रायण्णावार, तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे रिलायन्स इंडस्ट्रीजचे रमेश धनावडे, वाघोषी सरपंच अंकिता चिले व उपसरपंच रसिका देशमुख, उत्तम देशमुख, दीपक पवार, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version