। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शुक्रवार दि. 25 फेबु्रवारी रोजी कोरोनाच्या 24 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज सलग दुसर्या दिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. सात तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 36 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शुक्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 14, पनवेल ग्रामीण 2, उरण 1, कर्जत 2, अलिबाग 1, माणगाव 1, रोहा 1, सुधागड 1, महाड 1 असे 24 रुग्ण आढळले. खालापूर, पेण, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा व पोलादपूर या सात तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 452 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 490 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 692 वर गेला आहे. सद्यस्थितीत 270 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.