| अलिबाग | वार्ताहर |
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई संस्थेतर्फे अक्षरमंच काव्यलेखन स्पर्धेत माजी प्राचार्य, कोमसाप अलिबाग शाखेचे माजी अध्यक्ष डोंगरे हॉल वाचनालय अलिबागचे माजी कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागचे कार्यकारिणी सदस्य आणि जनमानसात रमणारे कवी अनंत देवघरकर यांनी सलग 60 महिने काव्यलेखन केल्याने त्यांना 29 डिसेंबर 24 रोजी देहू येथे भव्य समारंभात विश्वगुरू डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते शाल, पदक आणि संस्थेचा न्यायप्रभात अंक देऊन साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच भाई जगताप मित्र मंडळ रायगड, मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, अॅड. उमेश ठाकूर मित्र मंडळ संस्थेतर्फे कवी अनंत देवघरकर यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2025 ने गौरवण्यात आले.अनंत देवघरकर यांनी पाच दिवसात दोन पुरस्कार प्राप्त केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.