। उरण । वार्ताहर।
उरण तालुक्यातील आरटीआय अंतर्गत 25% कोटा भरावयाचा असतो. परंतु अनेक जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आरटीआय अंतर्गत सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने सोय केली आहे. यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत आहे. त्यासाठी उत्पन्नाची अट आहे. परंतु कोरोनाच्या काळामुळे ठप्प असलेली यंत्रणा आता सुरू झाली आहे. सदर आरटीआय सवलतीसाठी ऑन लाईन भरावयाची होती. त्याची मुदत संपून गेली आहे. परंतु यांची माहिती हातावर पोट भरणार्या सर्वसामान्य जनतेला माहिती नव्हते. त्यामुळे उरणमधील अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहाणार आहेत. तरी याचा सारासार विचार करून सदर आरटीआय अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.