उधाणामुळे 250 एकर जमीन पाण्याखाली

पेण । वार्ताहर ।
बुधवारी झालेल्या उधाणाच्या भरतीने जोहे खारबंदिस्ती, खारदुर्तफा, बोर्ली या भागामध्ये बाह्यकाठयाला मोठी खांड जाऊन उधाणाचे पाणी शेतजमिनीमध्ये शिरले आहे. त्यामुळे आत्ताच केलेली पेरणी पुर्णताः खार्‍या पाण्याच्या खाली आली असल्याने बळीराजा चितींत झाला आहे. वेळेच जर बाह्यकाठयाला पडलेली खांड बांधली नाही. तर पूर्णताः जोेहे विभागातील शेती नपीक झाल्याशिवाय राहणार नाही. या उधाणाच्या भरतीच्या पाण्याने जवळपास 200 ते 250 एकर जमिन बाधित केली आहे. सदरील फुटलेल्या खारबंधिस्ती विषयी खारलँड शाखेचे अभियंता कोळी यांना भ्रमणध्वनीवरुन विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, याविषयी मला काहीच माहिती नाही तरी माहिती घेऊन वरिष्ठांकडे पाठवितो. वरिष्ठांचे आदेश येताच तातडीने खांड बांधण्यासाठी प्रयत्न करतो.

शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या पुर्णताः खार्‍या पाण्याखाली गेल्याने रोपे येण्याची शक्यता कमी असल्याने पुन्हा पेरणीसाठी संक्रीत वाण मिळावे. यासाठी पेणचे नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तातडीने तलाठयांना आदेश काढून पंचनामे करण्यास सांगतो. त्यानंतर शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी नवीन बियाणांची गरज असल्यास कृषी अधिकार्‍यांना सांगून नवीन बियाणे उपलब्ध करुन देऊ असे त्यानी सांगितले.

खारदुर्तफा, बोर्ली या भागामध्ये बुधवारच्या उधाणाने भली मोठी खांड गेली आहे. या विभागातील शेतकर्‍यांनी 100 टक्के पेरणी केली असून खारे पाणी शिरल्याने भाताची रोपे कुजून जातील. जर तातडीने बाह्यकाठयाला गेलेली खांड बांधली नाही तर पूर्ण खलाटी नापीक होईल.

– माजी सरपंच, जोहे
Exit mobile version