अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत, संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग गुरुवार 8 जुलै रोजी सुरु होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून बुकींग सुरू करण्यात येणार आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. या ट्रेन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सर्व नियम पाळून चालविण्यात येणार आहेत.
काय आहे ट्रेनचं वेळापत्रक?
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड – दैनिक स्पेशल (36 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01227 – ही ट्रेन दररोज 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान सीएसएमटीहून रात्री 12.20 वा. सुटून सावंतवाडी रोडला दुपारी 2.00 वा. पोहोचेल.
ट्रेन क्र. 01228 – ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान दररोज सावंतवाडीहून दु. 2.40 वा. सुटेल आणि सीएसएमटीला पहाटे 4.35 वा. पोहोचेल.
स्टॉप कोणते असतील ?
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ
सीएसएमटी ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक (10 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01229 – ही ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून 2 वेळा म्हणजेच सोमवार आणि शुक्रवार सीएसएमटीहून दु 1.10 वा. सुटून रत्नागिरीला रात्री 10.35 वा. पोहोचेल.
ट्रेन क्र. 01230 – ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून 2 वेळा म्हणजेच रविवार आणि गुरुवार रत्नागिरीहून रात्री 11.30 वा. सुटून सीएसएमटीला सकाळी 8.20 वा. पोहोचेल.
स्टॉप कोणते असतील ?
दादर, ठाणे, (केवळ ट्रेन क्र. 01229) पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड
पनवेल ते सावंतवाडी रोड – त्रैसाप्ताहिक (16 फेऱ्या)
ट्रेन क्र. 01231 – ही ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि शनिवार पनवेलहून सकाळी 8.00 वा. सुटून सावंतवाडीला रात्री 8.00 वा.पोहचेल.
ट्रेन क्र. 01232 – ही परतीची ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि शनिवार सावंतवाडीहून रात्री 8.45 वा. सुटून पनवेलला सकाळी 7.10 मिनिटांनी पोहचेल.
स्टॉप कोणते असतील ?
रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ
पनवेल ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक स्पेशल (10 फेऱ्या)
ट्रेन क्र.01233- ही ट्रेन 9 ते 23 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच गुरुवार आणि रविवार पनवेलहून सकाळी 8.00 वा. सुटून रत्नागिरीला दुपारी 3.40 वा. पोहोचेल.
ट्रेन क्र. 01234 – ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच सोमवारी आणि शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री 11.30 वा. सुटून पनवेलला सकाळी 6.00 वा. पोहचेल.
स्टॉप कोणते असतील ?
रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
या सर्व गाडय़ांच्या डब्यांची स्थिती – एक एसी 2 टिअर कम एसी 3 टिअर, चार एसी 3 टिअर, 11 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग असेल.