। माले । वृत्तसंस्था ।
मालदीवची राजधानी माले येथे गुरुवारी (दि.10) विदेशी कामगारांच्या घरांना लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये नऊ भारतीयांचाही समावेश आहे. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडूनही याबाबतचे एक ट्वीट करण्यात आले असून त्यांनी मदतीसाठी फोन नंबरही दिले आहेत.
दरम्यान, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली ते एक अपमार्केट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. हे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. ही आग इतकी भीषण होती, की ती आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासांचा अवधी लागला.