। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी लसीचे दोन्ही मात्रांचे लसीकरण पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं सप्टेंबरपासून दिल्लीसह राजस्थानमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. तिसर्या लाटेत दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत असल्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.