। सुतारवाडी । वार्ताहर ।
डॉ.जी.आर. राजे प्रि.प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले. नर्सरी ते जूनियर, सिनियर के.जी.चे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये माझ्या पप्पांनी गणपती आणला, ओ कृष्णा है, हा गौरव महाराष्ट्राचा, पाटलांचा बैलगाडा, कोळी नृत्य, साउथ इंडियन नृत्य, देश रंगीला, बम बम बोले, रंग लागला, इत्तीसी हसी, स्कूल चले हम, ये तो सच है कि भगवान है, राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी आदि भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी पालकवर्ग आणि परिसरातील श्रोत्यांनी मनमुरादपणे चाखली. लहान मुला-मुलींना केलेल्या नृत्यावर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच, वर्षभरात आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक प्रमाणपत्र, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी डॉ. विश्वनाथ देशमुख, डॉ. सचिन धनावडे, डॉ. संजय पाटील, डॉ. रमेश राजे, सौरभ राजे, समृद्धी साळवी, मिलीना राजे, मोहन दोशी, हरिश्चंद्र महाडिक आदि मान्यवर उपस्थित होते.