। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील बाहे गावातील शेतकरी कै. बाळू गंगाराम थिटे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.1) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल होतेे.
तालुका कुणबी समाज युवक अध्यक्ष अनंत थिटे यांचे वडील असणारे कै. बाळू गंगाराम थिटे यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने थिटे परिवाराच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम कै. बाळू गंगाराम थिटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना सुरेश मगर, अनंत ढमाळ, यशवंत हळदे, शशिकांत कडू, अरविंद मगर, अरूण आगळे, डॉ.अनिल गीते, सुरेश थिटे, सहदेव ठमके, दीपिका पिंपळे, रूपाली खरात आदी मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमातंर्गत थिटे परिवाराच्यावतीने शाळेला कपाट भेट देऊन विद्यार्थी वर्गाला ओळखपत्र देण्यात आले. तसेच, त्यांची रक्तगट तपासणी करून खाऊचे वाटप करण्यात आले.