। मुंबई । प्रतिनिधी ।
टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिकला टी-20 चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्याला आयपीएलमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल. कर्णधार रोहित शर्माची निवड समितीसोबत बैठक झाली आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार हार्दिक पांड्याची निवड त्याच्या आयपीएलमधील गोलंदाजीवर अवलंबून आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत हार्दिक पांड्याने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करून सलग षटके टाकली तरच त्याला टी-20 चषकात स्थान मिळू शकेल, असा निर्णय घेण्यात आला. दोन तास चाललेल्या बैठकीत हार्दिकला पुनरागमन करायचे असेल तर त्याला सतत गोलंदाजी करावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला.