। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरी गुरूवारी होत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या दोन्ही बाद फेरीच्या सामन्यांसाठी सामना अधिकार्यांची घोषणा केली आहे. रिचर्ड इलिंगवर्थ आणि नितीन मेनन हे अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणार्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदानावरील पंच म्हणून काम पाहतील. या सामन्यात टीव्ही पंच म्हणून रिचर्ड केटलबरो, तर अहसान रझा हा चौथे पंच असतील. तर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात ख्रिस गॅफनी आणि रॉडनी टकर हे मैदानावरील पंच म्हणून काम पाहतील. जोएल विल्सन या सामन्यात टीव्ही पंच तर पॉल रीफेल चौथे पंच म्हणून काम पाहतील. यामुळे रिचर्ड कॅटलबरो अंपायरपासून भारतीय संघाची सुटका झाली आहे. रिचर्ड केटलबरोचे अनेक निर्णय भारतीय संघाच्या विरोधात गेले आहेत. विशेष म्हणजे रिचर्डचे हे निर्णय केवळ बाद फेरीत भारताविरुद्ध गेले आहे. त्यामुळे ते भारतीय संघासाठी फारच अशुभ सिद्ध झाला आहेत.