| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह दिल्ली अन् इतर ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुका कशा फिक्स करण्यात आल्या होत्या, त्याची काही आकडेवारी देऊन आरोप केले होते. यामुळे देशभरात यावरुन चर्चा सुरु झाली. स्वतंत्र संविधानिक संस्था असलेल्या भारतीय निवडणूक आयोगावर त्यामुळे पक्षपातीपणाचे आरोप होऊ लागले. यापार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या मागणीनुसार तसेच काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेला अनुसरुन महाराष्ट्र आणि हरयाणा या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचे मान्य केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसेच आणखी काही मागणीही केली आहे.