| रत्नागिरी | प्रतिनिधी |
लांजा ग्रामीण रुग्णालयजवळच्या सांस्कृतिक भवन येथे हलविण्यात आले असून, आता यापुढे नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाचे कामकाज सांस्कृतिक भवन येथून होणार आहे. लांबा ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नव्हती. ज्या जागेत ग्रामीण रुग्णालय हलवण्यात येणार आहे त्या सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट झालेले नाही.
ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतराचे काम एक वर्षाहून अधिक काळ रखडले गेले होते. पर्यायाने ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकाम कामाला सुरुवात होत नव्हती; मात्र आता सांस्कृतिक भवन या इमारतीचा फायर ऑडिट अहवाल आल्यामुळे ग्रामीण रुग्णालय जुन्या इमारतीतून सांस्कृतिक भवन या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. गुरुवारी ग्रामीण रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले. यामुळे जुनी इमारत पाडण्याच्या कामाला लवकरच प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून ही लांजा ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. रखडलेले नूतन इमारतीचे काम आता मार्गी लागणार आहे.