। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी एक भला मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना रविवारी (दि. 01) सकाळीच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, याबाबत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनादेखील कळविण्यात आले आहे.