एक गंभीर जखमी
। डोंबिवली । प्रतिनिधी ।
डोंबिवली येथे टेम्पोचालकाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 23) सायंकाळी झाला.
बुध्दशल खंडारे (15) आणि वैभव शेंडगे (16) हे दोघे बुधवारी संध्याकाळी खासगी शिकवणीला गेले होते. दुचाकीवरून ते एमआयडीसीतील कावेरी चौकातून जात घरी परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या धडकेत बुध्दशल याचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांनी या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि टेम्पोचालकाला ताब्यात घेतले.






