। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण परिसरातील शेतकरी विविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. असे असताना, शासकीय विभागातही अनागोंदी कारभार सुरू आहे. याची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे चिरनेरचे शेतीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी मंगळवारी (दि.4) रोजी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची विनंती केली आहे.
उरण परिसरातील शेकडो शेतकर्यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणाकडून फारसे प्रयत्न होत नसल्याने शेतकर्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्यांना भेडसावणार्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी मंगळवारी थेट जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन त्यांनी समस्यांचा पाढा वाचला आहे.







