| माणगाव | वार्ताहर |
मुंबईवरून रायगडमध्ये फिरायला गेलेल्या चार तरुणांपैकी एकाचा ‘चनाड’ धबधब्यात बुडून मृत्यू झाला. ऋषिक वासुदेव पाठीपाका (22) असे या तरुणाचे नाव आहे. माणगाव तालुक्यातील ‘चनाड’ धबधबा परिसरात ही घटना घडली. ‘एसवीआरएसएस’ या बचाव पथकाने घनदाट जंगलात असलेल्या या धबधब्यातून ऋषिकचा मृतदेह बाहेर काढला. धबधब्यावर जाण्याचा मार्ग अत्यंत अरुंद आणि धोकादायक असून, एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल अशा ठिकाणाहून मृतदेह बाहेर काढणे आव्हानात्मक होते. स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने या बचावकार्यात मोलाचे योगदान दिले. ‘चनाड’ धबधबा परिसरात जाण्यास बंदी असतानाही अनेक तरुण बिनधास्तपणे तिथे जातात, ज्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे दिसून येते. मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आला.







