| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने 227 कोटीच्या व्यवसायासह एकत्रित एक हजार कोटीचा टप्पा पार केला. बचत गट, मध्यम मुदत कर्ज अशा वेगवेगळ्या घटकांसाठी कर्ज योजना राबवून शेवटच्या घटकाला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न कमळ नागरी पतसंस्थेने केले आहे. जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असणाऱ्या पतसंस्थांमध्ये कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने अग्रक्रम मिळविला आहे, असे कमळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे यांनी सांगितले.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन मधूकर चाळके, माजी चेअरमन सतिशचंद्र पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कमळ नागरी सहकारी पतसंस्थे एक हजार 6 कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला. अलिबागच्या मध्यवर्ती भागात जागा खरेदी केली. 21 मार्चला या नुतन जागेत धार्मिक विधी तसेच कमळ परिवार मेळावा, सहकार स्वरसंध्या हा भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधत असताना बुधवारी (दि.18) ते बोलत होते.
यावेळी कमळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार चाळके व संस्थापक गिरीश तुळपुळे यांनी सांगितले की, कमळ नागरी पतसंस्थेची स्थापना 4 एप्रिल 1992 मध्ये झाली. आज पतसंस्थेला 33 वर्षे पुर्ण झाली आहेत. किरकोळ स्वरुपात भांडवल असलेल्या पतसंस्थेने प्रगतीशील मार्गावर टप्पा पार केला. सुरुवातीच्या कालावधीत 31 हजारहून अधिक ठेवी होत्या. 1992 मध्ये 60 लाखाचा एकत्रित व्यवसाय होता. पाच वर्षात तो सहा कोटीच्यावर पोहचला.2003 मध्ये 33 कोटी 29 लाख रुपये, 2023 मध्ये हा टप्पा 531 कोटीच्यावर गेला. 2025-2026 मध्ये एक हजार 3 कोटीपेक्षा अधिक व्यावसायिक टप्पा पार करण्यात पतसंस्थेला यश आले आहे. रायगड जिल्ह्यात एक मुख्यालय व 16 शाखा आहेत. पतसंस्थेमध्ये 124 अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. रायगड जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. पतसंस्था 776 ग्रामपंचायतींपर्यंत पोहचली असून एक हजार 949 पैकी एक हजार 300 वाड्यांपर्यंत पोहचण्यास पतसंस्थेला यश आले आहे. कमळ नागरी पतसंस्थेचा स्वनिधी 50 कोटी 36 लाख इतका असून खेळते भांडवल 623 कोटीहून अधिक आहेत. जिल्ह्यामध्ये 12 हजार 648 कर्जदार असून 46 हजार 242 इतके ठेवीदार आहेत.
पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांसह गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, मध्यम मुदत कर्जत अशा वेगवेगळ्या कर्ज योजना राबवून शेवटच्या घटकाला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आतापर्यंत पतसंस्थेने 439 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले असून पतसंस्थेच्या 564 कोटीहून अधिक ठेवी आहेत. आगामी काळात पतसंस्था मुंबईत स्थापन करण्याचा मानस आहे. आर्थिक व्यवसाय करीत असताना पतसंस्थेने सामाजिक बांधीलकीदेखील जपण्याचे काम केले आहे. अलिबागपासून दहा किलो मीटर अंतरावर गोशाळा उभारण्यात आली आहे. आज शंभरहून अधिक गो धन या ठिकाणी आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील पतसंस्थेने पाऊल उचलून कमी दरात डायलेलीस सेंटरची निर्मिती केली आहे. महिन्याला 92 हून अधिक रुग्णांहून अधिक या सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.
पतसंस्थेचे सुरुवातीचे कामकाज ऑफलाईन होते. बदलत्या काळानुसार पतसंस्थेनेे कामकाजही गतीमान केले आहे. संगणकीकरणासह कोअर बँकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कमळ नागरी पतसंस्था आज वेगळ्या उंचीवर पोहचली असून आगामी काळात दहा हजार कोटीचा टप्पा पार करण्याचा मानस असणार असल्याचे सांगण्यात आले.




