। पनवेल । वार्ताहर ।
गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने राहत्या घरामध्ये स्वतःच्या ताब्यात कब्जात बाळगून ठेवणार्या एका इसमास तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अक्रम हुसेन अब्दुल जलील खान हा अंमली पदार्थ स्वतः जवळ बाळगत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा वपोनि सय्यद यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे, पो.हवा.संतोष गायकवाड, पो.उपनिरीक्षक अनंत लांब आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या इसमाकडून 50 हजार 400 रुपये किंमतीचा 2 किलो 80 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.