। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायतील सदस्यपदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत क्रमांक तीन प्रभागातून शेतकरी कामगार पक्षाच्या मंगल झुजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निकालानंतर माजी चेरमन मोतीराम पाटील, महादेव कोळी समाज एकदरा अध्यक्ष पांडुरंग आगरकर, माया वाघरे, रोहन निशानदार, जयराम वाघरे, हरिश्चंद्र आगरकर, रामदास निशानदार यांनी जल्लोष करत मंगल झुजे यांचे अभिनंदन केले आहे.







