। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई – गोवा महमार्गावर पेण दुरशेत गावाजवळ पहाटे झालेल्या अपघातात, 1 ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. निकेश दोरकडे (वय 28) असे मयत तरुणाचे नाव आहे तर अल्पेश जाधव वय 27 रा. वडाळा हा यात गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे दापोली येथून फोटोग्राफीचे काम उरकून ते घरी परतत असताना दापोली ते वडाळा प्रवासात पेण दुरशेत गावाजवळ अपघात झाला. जखमी अपघातग्रस्तास देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णवाहीकेतून पनवेल एम् जी एम् येथे हलविण्यात आले.