| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील जनकल्याण सहकारी पतपेढीच्या शाखाधिकार्याने कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पतपेढीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपेढीचे शाखाधिकारी सुधीर महाडिक असे या आरोपीचे नावं आहे. यांनी शहरातील एका महिलेला कर्ज मंजुर करून देतो, कर्ज मंजुर करून देणे माझ्या हातात आहे असे सांगून पिडीत महिलेच्या मोबाईलवर सातत्याने कॉल करून अश्लिल कृत्य केले. अधिक तपास पोलीस हवालदार एच.एच. डवले या करीत आहेत.