। रेवदंडा । वार्ताहर ।
कराटे विदयार्थ्याचे थरार प्रात्यक्षित पहातानाच त्यांचे संघटन व कौशल्य अप्रतिम होते, असे कौतुकास्पद उद्गार शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रेवदंडा येथील समरकॅम्पच्या समारोप कार्यक्रमात काढले.जिल्हा कराटे असोसिएशनच्या वतीने दि. 18 ते 22 मे रोजी रेवदंडा येथील ज्येेष्ठ नागरिक संघाच्या विरगुंळा उदयानात समरकॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात ते दहा व सध्याकांळी साडेतिन ते साडेसहा दरम्यान या समरकॅम्पमध्ये कराटे, लाठीकाठी, ज्युदो, एरोबिक, योगा आदी क्रिडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले.
या समरकॅम्पचा समारोप कार्यक्रम दि. 22 मे रोजी सायकांळी झाला. या कार्यक्रमास शेकापक्षाचा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापक्षाचे अलिबाग तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, जिल्हा कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. विजय वरसोलकर, शरद वरसोलकर, दत्ता वरसोलकर, सरोज वरर्सोलकर, सुभाष चिटणीस, सुरेश खोत, संतोष मोरे, संदिप खोत, निलेश खोत, डॉ. अमर पाटील आदीची उपस्थिती होती.
यावेळी विदयार्थ्याचे थरार प्रात्यक्षित त्यांचे संघटन व कौशल्य अप्रतिम होते, असे कौतुकास्पद उद्गार शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काढले तसेच आ. जयंत पाटील यांच्या निधीतून उभारलेले ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरगुंळा केंद्राचे अभिमान व्यक्त करतानाच येथे घेण्यात येत असलेल्या विविध स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
या समरकॅम्पचा शुभारंभ कार्यक्रम रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा चुनेकर, जिल्हा कराटे असोसिएशन उपाध्यक्ष डॉ. विजय वरर्सोलकर, दत्ता वरसोलकर, शरद वरसोलकर, रजनी वरर्सोलकर, रोहन भगत, नंदकुमार वरर्सोलकर, ओमकार वरसोलकर, प्रशांत म्हात्रे, आदीची उपस्थिती होती.