। पाली/बेणसे- । प्रतिनिधी ।
द पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टचे जनसंपर्क कार्यालय उलवे या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कदम, रायगड जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राजाराम मोरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सचिन मोरे, ट्रस्ट चे खजिनदार राजेंद्र वाघमारे, ऑल इंडिया पँथर संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, प्रा. प्रवीण बागुल सर, पुणे संपर्क प्रमुख बाळासाहेब ननावरे आदी प्रमुख पाहुणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मदि पीपल्स वेल्फेअर ट्रस्टफ चे सदस्य सचिन मोरे यांची रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली उद्घाटन प्रसंगी दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि कोविड मध्ये चांगली कामगिरी केलेले डॉक्टर तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा मदि पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट कडून सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.