| कोर्लई | वार्ताहर |
बागडे प्रतिष्ठान व कोमसाप मुरूड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.गजानन(भाऊ)बागडे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना काव्य संगीतातून आदरांजली वाहण्यात आली. कोमसाप शाखाध्यक्ष संजय गुंजाळ, उषा खोत, उर्मिला नामजोशी, सोनाली बागडे, आशिष पाटील, सिद्धेश लखमदे, वासंती उमरोटकर, प्रतिभा जोशी, उर्मिला नामजोशी, वैशाली कासार यांनी स्वरचित व भाऊंच्या कविता, लेख, अभिवाचन सादर करून भावपुर्ण आदरांजली अर्पण केली.
यावेळी नैनिता कर्णिक यांनी भाऊंच्या उपेक्षित पुस्तकातील काही कथा वाचल्या. अरुण बागडे, प्रदीप बागडे, प्रतिभा बागडे, उमा बागडे, प्रतिभा मोहिले यांनी गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा शेवट जेष्ठ शास्त्रीय गायक डॉ. रविंद्र नामजोशी यांच्या सुरेल भैरवीने झाला. सदर मैफिलीला तबलासाथ तबलाबादक महेश सुर्वे यांनी केली, हार्मोनियम साथ अरूण बागडे यांनी केली. माजी तहसीलदार नयन कर्णिक यावेळी उपस्थित होते.शेवटी उषा खोत यांनी उपस्थित सर्व मान्यवर सदस्यांचे व बागडे कुटुंबियांचे आभार मानले.