| कर्जत | वार्ताहर |
कर्जत नगरपरिषदेच्या प्रांगणात गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, बळवंत घुमरे, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, डॉ. ज्योती मेंगाळ, प्राची डेरवणकर, वैशाली मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी तीन हजार 600 किलोमीटर अंतराची नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार्या श्रीराम पाठक, अविनाश उपाध्ये, दीपक कुलकर्णी, धंनजय जोशी, राजन दगडे, विजय दगडे, कैलास गायकवाड, विजय ढेंगे, स्नेहलता ढेंगे, श्रीराम उपाध्ये, मुकुंद मेहेंदळे, मोहिनी गायकवाड, उर्मिला जोशी, सुनील भिडे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सैनिक स्कूल रिवा (मध्यप्रदेश ) मध्ये निवड झालेल्या दहा वर्षांच्या उत्कर्ष दगडे या विद्यार्थ्याचा व महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी पद मिळणार्या नेहा आढाव यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळविणार्या स्पर्धकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. रवींद्र लाड यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी, पद्माकर गांगल, दामोदर शहासने, पांडुरंग गरवारे, सुदाम म्हसे आदी उपस्थित होते.







