| पनवेल | वार्ताहर |
कोल्हापूर येथून देवदर्शन करून आपल्या घरी परतताना एका कुटुंबावर काळाने झडप घातली. सोमवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास वाहन वरील नियत्रंण सुटल्याने कारचालकाने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात वाहनाला डाव्या बाजूने जोरात धडक दिली. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील एकाला आपल्या प्राण मुकावे लागले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
भिवंडी, मानकोली येथे राहणारे साहू कुटुंबीय कोल्हापूर येथून देवदर्शन करून आपल्या किआ कारने (एमएच 04 एलएच 9479) ने घरी पुन्हा परतत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर पोलीस ठाणे हद्दीत कारचालक अभिषेककुमार मुन्नीलाल साहू (वय 37) याला अतिवेगाने वाहन चालवत असताना त्याने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला डाव्या बाजूने जोरात धडक दिली. या धडकेत कारमध्ये असलेले मुन्नीलाल साहू (वय 68) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर कारचालक अभिषेक मुन्नीलाल साहू (वय.37) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्याचप्रमाणे शांतीदेवी मुन्नीलाल साहू (वय 60 वर्षे) यांचे डावे पायाला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखा पळस्पे मोबाईल पथक व आयआरबी पथक यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेने एमजीएम हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले.