| आगरदांडा | प्रतिनिधी |
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पुर्ण होणाऱ्या मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मतदारांना आपले नाव ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मतदार यादीत समाविष्ट करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मतदार यादीच्या शुध्दीकरण करणेकामी मतदार यादीतील ब्लर छायाचित्रे आणि वय वर्ष 80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची तपासणी करुन सदर मतदारांची जन्मतारीख अद्यावत करुन शंभर टक्के पडताळणी पुर्ण करण्यात येणार आहे. यादीतील मयत मतदारांच्या नोंदीची वगळणी करण्याकरता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 21जुलै ते 21ऑगस्ट पर्यंत घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 17 ऑक्टोबर 30नोव्हेबर पर्यत दावे व हरकती स्वीकारणात येतील. दावे व हरकती 26 डिसेंबर 2023 पर्यंत निकाली काढण्यात येतील. 5जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण तसेच मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी तहसीलदार कार्यालयात घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली.यावेळी मतदार नोंदणीसाठी नवीन व पात्र मतदारांनी नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ऋषिकांत डोंगरीकर, नरेश वारगे, बाळकृष्ण गोंजी, विजय पैर, श्रीकांत गुरव आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्षांना त्यांचे स्तरावर बुथ लेवल एजंट(बीएलऐ)यांची नेमणूक करण्याचे आवाहन केले.