कामावर गेलेला इसम बेपत्ता

| पनवेल । वार्ताहर ।
कामावर जातो असे सांगून एक इसम घराबाहेर पडला तो अद्याप घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नविद मोहसीन अधिकारी (वय 54) रा. पाडा मोहल्ला पनवेल, रंग गोरा, उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, डोक्याचे केस काळे-पांढरे, दाढी कोरलेली असून अंगात क्रीम रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट व पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर 02227452333 किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version