मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोट

। धुळे । प्रतिनिधी ।

भाजपच्या विजयात मतविभाजनाच्या डावपेचांचे बरेचसे योगदान असते. विशेषतः लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपकडून पडद्याआडून तसे डावपेच रचले जात असतात. ते काँग्रेसचे मताधिक्य कमी होण्यासाठी, तर भाजपचे मताधिक्क्य वाढीसाठी असतात. यंदा निवडणुकीत मतविभाजन करू शकणारे दोन प्रमुख पक्ष रिंगणाबाहेर असल्याने नशीब आजमावणार्‍या सात मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी लागणार आहे. यामागचे डावपेच कुणाच्या पथ्यावर पडतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

मालेगाव मध्य, धुळे, सोनगीर, दोंडाईचा, नरडाणा येथील मुस्लीमबहुल भागावर काँग्रेसची अधिकतर भिस्त आहे. असे भाग वगळून भाजपचा प्रचार होत असतो. या मतदारसंघात 2009 ला एकूण 15 उमेदवार होते. पैकी 7 उमेदवार मुस्लीम समाजाचे होते. याप्रमाणे 2014 ला एकूण 19 उमेदवारांपैकी 11 मुस्लीम, 2019 ला एकूण 28 उमेदवारांपैकी 13 मुस्लीम, तर यंदा 2024 च्या निवडणुकीत एकूण 18 पैकी 7 उमेदवार मुस्लीम समाजाचे आहेत. राजकीय पटलावर हे उमेदवार भाजपने उभे केले की ते स्वतःहून रिंगणात आहेत हा चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. ताकदीवर निवडणूकवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे प्रमुख दोन पक्ष लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील रिंगणात नसल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत आहे. मुस्लीमबहुल भागातील अधिकाधिक मते आपल्याच पारड्यात पडतील, असा काँग्रेसला विश्‍वास आहे. या समाजाचे यंदा सात उमेदवार रिंगणात असताना ते कसे शक्य होते याकडे भाजपची नजर असेल.

Exit mobile version