| बोर्ली पंचतन | वार्ताहर |
एअरटेल कंपनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात मोटारसायकल कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गोंडघरनजीक सोमवारी रात्री घडली. सुशांत काशीनाथ नाईक असे मृत युवकाचे नाव आहे. तो येथील पेट्रोल पंपावर रात्रीचे काम करीत असे, तर दिवसा मेंदडी येथे दवाखान्यात काम करीत होता. त्याचे वडील काशीनाथ नाईक हे गोंडघर ग्रामपंचायतमध्ये शिपाई आहेत. या अपघाताची नोंद दिघी पोलिसांत झालेली आहे. या अपघातप्रकरणी सुशांत नाईकच्या कुटुंबियांना एअरटेल कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. अपघाताची नोंद दिघी पोलिसात करण्यात आली आहे.