| पनवेल | वार्ताहर |
तळोजा भागात राहणार्या एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारत जाधव (25) असे त्याचे नाव असून, तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. जाधवच्या घरी पीडित मुलीच्या कुटुंबाचे येणेजाणे होते. जून 2024मध्ये त्याने मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, त्याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. मात्र, जाधवने वारंवार लैंगिक अत्याचार करणे सुरूच ठेवल्याने पीडित मुलीने आईला याबाबतची माहिती दिली. मुलीच्या आईने शुक्रवारी (दि.04) तळोजा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर जाधव हा फरार झाला आहे. तळोजा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.