| पनवेल | वार्ताहर |
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 24 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील 23 वर्षीय पीडित महिलेचे लग्न झाले असून, ती पनवेल तालुक्यात राहते. या महिलेसोबत 24 वर्षीय तरुणाने सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण करून तिला तिच्या पतीला सोडून दे, मी तुझ्याशी लग्न करतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्याशी गोड बोलून तिच्यावर जुलै 2024 मध्ये बलात्कार केला. मात्र, त्यानंतर तो आपल्याशी लग्न करीत नसल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.