। पनवेल । वार्ताहर ।
आदई गावाजवळील पुलावरुन दिनेश शिंदे (45) हे त्यांच्या ताब्यातील गाडी घेऊन मुंबई-पुणे महामार्गावरुन जात होते. खांदेश्वरजवळ येताच अचानक त्यांनी गाडीचा वेग कमी केला असता पाठीमागून येणार्या ट्रकचालकाला ट्रक नियंत्रित न झाल्याने गाडीला मागून जोरात धकडकून भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील निर्मला जनार्दन शिंदे (62) या गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर, दिनेश शिंदे, शिल्पा शिंदे व वैष्णव दिनेश शिंदे हे जखमी गंभीर झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे पथक, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे व त्यांचे पथक, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशंकर तसेच आयआरबी पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे तात्काळ हलविण्यात आले. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.