खोकरी वळणावर एसटीला अपघात; 11 जण जखमी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

रोजच्याप्रमाणे मुरुड आगरदांडाला जाणारी एसटी चालक संतोष सिकारे व वाहक समिधा मुकादम यांनी सकाळी 7.30 वाजता डेपोतुन आगरदांडा गावाकरिता जाणाऱ्या करिता निघाली. तीच गाडी सकाळी आगरदांडा वरुन 15 शालेय विद्यार्थ्यांना मुरुडला घेऊन जात असताना खोकरी याठिकाणी वळणावर एसटी चालकांनी जोरदार ब्रेक लावल्याने गाडी स्लीप होऊन गाडी मोठ्या झाडांवर आदळली त्यामध्ये 15 अंजुमन इस्लाम हायस्कूल व डिग्री काॅलजेचे विद्यार्थी प्रवास करत होते त्यापैकी 11 जखमी विद्‌यार्थांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक उदय झावरे व सहाय्यक पोलिस हवालदार – दिपक राऊळ आदिंसह पोलिस कर्मचारी येऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच अंजुमन इस्लाम हायस्कूल चे प्राचार्य – जाहिद गोठेकर, चेअरमन – रहिम कबले, डिग्री काॅलजेचे प्राचार्य डॉ.साजिद शेख, ऋषिकांत डोंगरीकर, आगरदांडा सरपंच आशिष हेदुळकर श्रीकांत सुर्वे, कुणाल सतविडकर, रूपेश जामकर जखमी विद्यार्थी चे पालक आदिंसह हिंदु मुस्लिम ग्रामस्थ यांनी पाेहचून विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर – प्रफुल्ल धुमाळ यांनी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून त्यापैकी चार विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर 7 जणांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत.

Exit mobile version