। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील भाले येथील फिर्यादी सागर सुरेश खानविलकर यांच्या मालकीच्या म्हशीला काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून फिर्यादी यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने शोध घेतला परंतु रात्रीचा फायदा घेऊन सदर गुन्ह्यात हे घटनास्थळावर त्यांच्या ताब्यातील होंडा सिटी गाडी सोडून पळून गेले होते. सदरील गुन्हा 5 फेब्रुवारी रोजी रात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर घडून या गुन्ह्याची फिर्याद सागर सुरेश खानविलकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुन्ह्यातील आरोपी अली मुद्दी शेख रा. कुरमुरा भट्टी, भुर कंपाऊंड मुंब्रा हा आपल्या चार साथीदारांसह नजरेआड झालेला होता. हा आरोपी 12 मार्च रोजी त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची बातमी पोलिसांना लागली होती. त्यानंतर गुन्ह्याची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याकडील तपास पथकाने ठाणे येथे जाऊन त्यांच्याकडे अधिक तपास करता गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्याची नोंद नव्याने माणगाव पोलीस ठाण्यात रजि नं.20/2022 भादवि संहिता कलम 429, 511, 34 प्रमाणे दाखल करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेग, पोलीस शिपाई तांदळे, गोविंद तलवारे, रामनाथ डोईफोडे, शाम शिंदे यांनी केली असून सायबर शाखा रायगडचे अंमलदार अक्षय पाटील यांच्या पथकाने केली आहे.