। पनवेल । वार्ताहर ।
खिडका मध्यमंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्यात येत आहे. हे डेब्रीज मानवी आरोग्याला धोकादायक असून पर्यावरणासाठी देखील हानीकारक आहे. या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्यासाठी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस विभाग यांनी मंगळवारी (दि.03) रात्री सिडकोच्या कार्यक्षेत्रात मोहिम राबवली. यावेळी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक पाच ब्रासच्या डंपरमधून नवी मुंबई येथील वेगवेगळ्या मोकळ्या जागेमध्ये डेब्रीज टाकण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे वाशी टोलनाका येथे आढळून आला. या डंपरचे चालक मनेश श्रीराम गुप्ता (26) रा. मांडाला मानखुर्द यांनी डंपरचे मालक जनक प्रज्ञागती (24) यांच्या सांगण्यावरून मानवी आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रीज टाकण्यासाठी सांगितले असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले असून डंपर चालक व मालक या दोंघावरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच, सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या वेब साईटवर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.