अवैद्य पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| तळा । वार्ताहर ।

शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होत आहे हे वास्तव असून तळा शहरातील मुख्य रस्त्यावर रिक्षा स्टॅन्ड ते बँक ऑफ इंडिया नाक्यापर्यत रहदारीच्या रस्त्यावर मोटरसायकल पार्किंगने जागा घेतली आहे. बेशिस्त मालक आपली वाहने बिनधास्तपणे व्यापार्‍याच्या दुकानात समोर दिवसेंदिवस पार्कींग करून लावली जात असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडी वरती कोणताही नगरसेवक अळी मिळती खुप चिळीची भुमीका घेताना दिसत आहे. तसेच वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचार्‍याची मागणी करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्र गंभीर झाला आहे व नगरपंचायत प्रशासन कारवाई करताना दिसून येत नाही हे हटवण्यामध्ये नगरपंचायत प्रशासन कोणतीही कडक कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा वृतपत्राचे माध्यमातून निदर्शनात आणून देखील सुस्त प्रशासन असल्याचे दिसून येत आहे. मोटारसायकल व इतर खाजगी वाहने पार्कीगची सोय केली असून देखील त्या आदेशाला जुमानत नाहीत. अशा वाहन चालकावर कारवाई करावी. त्यांच्याकडून कोणते प्रकारची पार्किंगची दंडात्मक पावती पडली जात नसल्यामुळे महसूल बुडाला जात आहे.

Exit mobile version